संस्कृतीरक्षकांची सेन्सॉरशिप चिंताजनक: दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

आपल्या चित्रपट क्षेत्रातील रंजक अनुभव सांगतानाच सेन्सॉरशिपविषयी त्यांनी म्हटले, की सेन्सॉर बोर्डावर चित्रपट बघताना तिथल्या चार माणसांचे वैयक्तिक समज असतात. त्यांना धरून हे लोक काहीही वाद घालतात. गाईडलाईन जरूर असावी. पण सत्तांतर झाले, की या सगळ्या कमित्या बदलल्या जातात. योग्यता नसलेली माणसे येऊन बसतात.

औरंगाबाद : समाजातील संस्कृतीरक्षकांची सेन्सॉरशिप जास्त काळजी करण्याजोगी आहे. सत्तांतर झाले की कमिट्या बदलतात आणि नको तिथे वाद घालत बसतात, असे वास्तव असल्याचे परखड मत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी रविवारी (ता. 27) व्यक्त केले. सेन्सॉर बोर्डाची गरज नाही असं उच्चारवाने बोलताना घटनेची पायमल्ली होणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयातर्फे रविवारी (ता. 27) 'सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप' या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मराठी सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमिरेट्स प्रोफेसर वि. ल. धारूरकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके उपस्थित होते.

आपल्या चित्रपट क्षेत्रातील रंजक अनुभव सांगतानाच सेन्सॉरशिपविषयी त्यांनी म्हटले, की सेन्सॉर बोर्डावर चित्रपट बघताना तिथल्या चार माणसांचे वैयक्तिक समज असतात. त्यांना धरून हे लोक काहीही वाद घालतात. गाईडलाईन जरूर असावी. पण सत्तांतर झाले, की या सगळ्या कमित्या बदलल्या जातात. योग्यता नसलेली माणसे येऊन बसतात. त्यांच्याशी वाद घालता घालता सृजनकर्त्याची चिडचिड होते. आजचा दिवस माझा, मुरांबा यासारख्या सिनेमालाही फुटकळ जागी आक्षेप घेतले गेले, हे योग्य नाही. नको ते सिनेमे सुटतात आणि चांगले चित्रपट यांच्या कात्रीत सापडतात, असे सांगताना श्री. कुलकर्णी यांनी इतर देशांतील सेन्सॉरशिपचीही थोडक्यात माहिती दिली.

Web Title: Aurangabad news Chandrakant Kulkarni talked about film sensorship