साडेतीन एकर जमीन सिडकोने घेतली ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद - सिडको प्रशासनाने मंगळवारी शिवाजीनगर जलकुंभ परिसरातील साडेतीन एकर जमीन ताब्यात घेतली. मागील काही वर्षांपासून त्या जागेच्या मालकीसंबंधी वाद सुरू होता. सर्वोच्च न्यायालयात त्याप्रकरणी संबंधित जागा मालकाने धाव घेऊन दावा केला होता. निकाल आल्यानंतर मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण हटाव पथकाने ती जागा ताब्यात घेण्याची कारवाई केली. 

सिडकोने केलेल्या भूसंपादनाला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. ती याचिका फेटाळण्यात आल्यानंतर सिडकोने साडेतीन एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली, अशी माहिती सिडकोचे अधिकारी माधव सूर्यवंशी यांनी दिली. येत्या काही महिन्यांत त्या जागेवर प्लॉटिंग पाडण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. निवासी आणि व्यावसायिक प्रकारातील काही भूखंड तेथे सिडको सोडतीद्वारे विक्रीसाठी काढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: aurangabad news cidco