उड्डाण पुलाच्या नामकरणावेळी निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद - येथील सिडको उड्डाण पुलास रविवारी (ता. 27) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यात आले. याला राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करीत कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. शिवाय, या उड्डाण पुलास हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी लावून धरत निदर्शने केली. पोलिसांनी 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

सिडकोतील चौकाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आलेले आहे, त्यामुळे येथील उड्डाण पुलालाही त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी होती. दरम्यान, महापालिकेने उड्डाण पुलास सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी सकाळी साडेदहा वाजता नामकरण सोहळा झाला; पण कार्यक्रमापूर्वी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन घोषणाबाजी करीत नाईक यांचे नाव देण्याची मागणी केली. पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतले. यांनतर नामकरण सोहळा पार पडला. 

दोघांचीही नावे लिहिणार 
आम्ही दोन्ही महापुरुषांचा तेवढाच आदर करतो. राष्ट्रीय बंजारा परिषद आणि गोर सेनेचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले. उड्डाण पूल तयार झाला तेव्हाच सावरकरांचे नाव देण्याचे ठरले होते. आता उड्डाण पुलावर ठळक अक्षरांत वसंतराव नाईक चौक आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावकर उड्डाण पूल अशी दोन्ही नावे लिहिण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. 

तीव्र आंदोलनाचा इशारा 
या उड्डाण पुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची माणगी गोर सेनेने खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागणीची पूर्तता झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. 

Web Title: aurangabad news CIDCO Flyover name Demonstrations