संशयित चोरास सोमवारपर्यंत कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

औरंगाबाद - जटवाडा रोडवरील मजुराच्या घरात चोरी करून साडेआठ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस शुक्रवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

या प्रकरणी प्रल्हाद गायकवाड (रा. जटवाडा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आठ सप्टेंबर २०१७ ला मध्यरात्री घरातून जुने मनगटी घड्याळ, तीन मोबाइल हॅंडसेट असा आठ हजार ८०० रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली. त्यानंतर एक हजार २०० रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाल्याची पुरवणी तक्रारही त्यांनी दिली. या प्रकरणी रेहान रऊफ पठाण (जहांगीर कॉलनी, हर्सूल परिसर) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, संशयिताकडून हॅंडसेट व रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. तसेच त्याने आणखी कुठे-कुठे गुन्हे केले आहेत का, आणखी कोणी साथीदार आहेत का, आदींचा तपास करणे बाकी आहे. त्यामुळे संशयित आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. डी. वरपे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने पठाण याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: aurangabad news crime