भाग्यश्री होळकरसह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - सातारा परिसरातील छत्रपतीनगरात राहणाऱ्या पतीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नी भाग्यश्री होळकरसह चौघांची शनिवारी (ता. २३) पोलिस कोठडी संपली. चौघांनाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांनी आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.  

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक जितेंद्र होळकर (रा. छत्रपतीनगर) यांचा नऊ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि सायबर सेलच्या पथकाने संयुक्तरीत्या तपास करून २४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला. 

जितेंद्र होळकरच्या खुनाची दोन लाखांत सुपारी देणारी पत्नी भाग्यश्री आणि सुपारी घेणारा किरण काशिनाथ गणोरे, गळा चिरून खून करणाऱ्या शेख तोशीफ शेख इब्राहिम, शेख हुसेन ऊर्फ बाबू शेख बशीर (दोघेही रा. जुनाबाजार) अशा चौघांना गजाआड केले. त्यांना न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्या चौघांची पोलिस कोठडी संपल्यामुळे शनिवारी (ता. २३) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: aurangabad news crime

टॅग्स