नगरसेवक कुलकर्णीस अटक आणि सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते, सिडको एन-आठचे नगरसेवक मकरंद कुलकर्णीवर महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला सोमवारी (ता. १५) सकाळी राहत्या घरातून अटक करण्यात आली.  नगरसेवक मकरंद कुलकर्णी याने गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास एका ३९ वर्षीय महिलेचा पाठलाग करून ‘तू काहीही केले, तरी तुला सोडणार नाही’ असे म्हणून विनयभंग केला; तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सोमवारी (ता.

औरंगाबाद - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते, सिडको एन-आठचे नगरसेवक मकरंद कुलकर्णीवर महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला सोमवारी (ता. १५) सकाळी राहत्या घरातून अटक करण्यात आली.  नगरसेवक मकरंद कुलकर्णी याने गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास एका ३९ वर्षीय महिलेचा पाठलाग करून ‘तू काहीही केले, तरी तुला सोडणार नाही’ असे म्हणून विनयभंग केला; तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सोमवारी (ता. १५) त्याला पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. गुन्हा जामिनपात्र असल्याने सायंकाळी चार वाजता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली, असे ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एम. प्रजापती यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news crime corporator