यंदा फटाक्‍यांचा आवाज कमीच! 

संदीप लांडगे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - गतवर्षी झालेल्या अग्नितांडवामुळे यंदा फटाका मार्केट शहराच्या बाहेर गेले. त्यामुळे फटाका विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. शिवाय फटाका विक्रेत्यांना उशिरा परवानगी देऊन तीन दिवसच दुकाने लावण्यास वेळ दिल्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली. परिणामी, यंदा शहरात केवळ 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

औरंगाबाद - गतवर्षी झालेल्या अग्नितांडवामुळे यंदा फटाका मार्केट शहराच्या बाहेर गेले. त्यामुळे फटाका विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. शिवाय फटाका विक्रेत्यांना उशिरा परवानगी देऊन तीन दिवसच दुकाने लावण्यास वेळ दिल्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली. परिणामी, यंदा शहरात केवळ 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

शाळा, महाविद्यालये व माध्यमांद्वारे होणाऱ्या जनजागृतीमुळे फटाक्‍यांची मागणी अगोदरच घटली आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांच्या विक्रीत घट दिसली. शिवाय जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, राजीव गांधी स्टेडियम, मुकुंदवाडी, चिकलठाणा या ठिकाणी फटाका मार्केट लावण्यास न्यायालयाने बंदी घातली. या फटाका मार्केटला अयोध्यानगरी, बीड बायपास, कलाग्राम अशा ठिकाणी शहराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याने ग्राहकांची संख्या खूपच कमी राहिली. या भागात फटाक्‍यांचे तात्पुरते स्टॉल लावण्यास फक्त तीनच दिवस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाली. उर्वरित माल तसाच पडून आहे. 

ग्राहकांना माहितीच नाही 
दिवाळीच्या अगोदर आठ दिवसांपासून फटाके घेण्यास ग्राहकांची गर्दी सुरू असते; परंतु यावर्षी तीन दिवस परवानगी मिळाली आणि दोन दिवस थोड्याफार प्रमाणात गर्दी वाढली होती; परंतु फटाका मार्केट कुठे लावले याची माहिती ग्राहकांना न मिळाल्यामुळे यंदा विक्रीत घट झाल्याचे फटाका व्यावसायिक मोहनलाल कासलीवाल यांनी सांगितले. 

मागच्या वर्षी जळीतकांडामुळे आर्थिक व मानसिक फटका बसला होता. यंदा फक्त तीन दिवस परवानगी दिली. तसेच फटाका मार्केटला शहराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. दुकानापासून गाडी पार्किंगही लांब ठेवण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांनी फटाका मार्केटकडे काणाडोळा केला. परिणामी, विक्रीत घट झाली. 
- विनोद खामगावकर, अध्यक्ष, फटाका मार्केट असोसिएशन. 

सुरक्षेकडे लक्ष 
मागच्या वर्षी फटाका मार्केटला आग लागली होती. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले होते; मात्र यावर्षी ज्या ठिकाणी स्टॉल लावण्यास परवानगी दिली होती, तेथे अग्निशामक दलाची एक गाडी व पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. तसेच दोन दुकानांमध्ये किमान अंतर ठेवण्यात आले होते. 

Web Title: aurangabad news diwali festival Crackers

टॅग्स