‘घाटी’त चार्ली अन्‌ डॉक्‍टरांमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

औरंगाबाद - विष प्राशन केलेल्या रुग्णास चार्ली पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने ‘घाटी’त आणले. मात्र, उपचारास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देत असताना चार्ली पोलिस आणि डॉक्‍टरांमध्ये वाद झाला. ही घटना शनिवारी (ता. १६) घडली. 

चिंचोली तांडा येथील रहिवासी रोहिदास हरी राठोड यांनी विष घेतले होते. त्याला उपचारासाठी त्याचे भाऊ जगन राठोड व एकनाथ राठोड हे दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत होते. आकाशवाणी चौकामध्ये चार्ली पोलिसांना हा प्रकार दिसला. त्यांनी चौकशी केल्यानंतर भावाने विष घेतल्याने घाटीत नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर चार्ली पोलिसांनी संबंधित रुग्णास आपल्या गाडीतून घाटीत नेले. तेथे गेल्यानंतर डॉक्‍टरांनी रुग्णास तपासले. रुग्णाला वॉर्डात शिफ्ट करण्यास उशीर होत असल्याने चार्ली पोलिसांनी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करण्याची विनंती केली. त्यावरून डॉक्‍टरांनी चार्लींना बाहेर जाण्यास सांगितले अन्‌ वाद उद्‌भवला. अखेर दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला व रुग्णावर उपचारास सुरवात झाली.

Web Title: aurangabad news doctor