शहरात  मृत्यूच्या ‘वाहिन्या’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - महावितरणच्या नाकर्तेपणाने शहरात जनावरांचे आणि माणसांचेही बळी जात आहेत. वीजचोरी आणि वसुलीच्या कामात व्यस्त असलेल्या महावितरणला धोकादायक वीज यंत्रणेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. जीव गमवावे लागत असताना, अजूनही शहरातील सताड उघडे फ्यूज बॉक्‍स, धोकादायक डीपी (ट्रान्स्फॉर्मर), झाडांमध्ये घुसलेल्या धोकादायक व लोंबकळणाऱ्या तारा कायम आहेत. आणखी किती जणांचे बळी गेल्यावर महावितरणला जाग येणार, असा सवाल व्यक्त केला जात आहे. 

महावितरणतर्फे पावसाळ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी विजेच्या धक्‍क्‍यापासून वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, याच्या टिप्स प्रसिद्ध केल्या आहेत. प्रत्यक्षात महावितरणच्या गलथान आणि बेफिकीर कारभाराने उभ्या असलेल्या महावितरणच्या धोकादायक यंत्रणा नागरिकांचे जीव धोक्‍यात घालत आहेत. गेल्या महिनाभरात एका व्यक्तीचा आणि पाच ते सहा जनावरांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने प्रकाश टाकल्यावर काही कामे करण्यात आली; मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर धोकादायक यंत्रणा उभी आहे. भरपावसाळ्यात आजही चौकाचौकांत उघडे फ्यूज बॉक्‍स आहेत. अनेक ठिकाणी झाडांमध्ये तारा घुसल्याने मोठा अनर्थ होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये हाताला लागाव्यात अशा पद्धतीने विजेच्या तारा लटकलेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ‘प्री-मॉन्सून मेंटेनन्स’च्या नावाखाली देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात; मात्र यामध्ये दाखविण्यापुरती काही क्षुल्लक कामे करून अधिकारी मोकळे होत आहेत. नागरिकांचे जीव जात असतानाही महावितरणला आपली यंत्रणा सुधारण्याची गरज अजूनही वाटत नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: aurangabad news electric wire