बनावट वेबसाईटद्वारे पन्नास लाखांची फसवणूक

मनोज साखरे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह  यांनी माहिती दिली की, शेखर पोद्दार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वेबसाईटद्वारे देशात 80 जणांची फसवणूक केली व आतापर्यंत 50 लाख रुपये हडपले. शेखरविरुद्ध उत्तरप्रदेश, नागपूर व औरंगाबादेत चार गुन्हे नोंद आहेत. त्याने या पूर्वी नागपुरात लोकल एजंसी थाटून फसवणूक केली होती. तसेच देशाच्या अशोक स्तंभाचा बेकायदेशीरपणे वेबसाईटवर वापर केला होता.

औरंगाबाद : महा इ सेन्टर या नावाने वेबसाईट तयार करून एक वर्षांपासून महाठगाने तिकीट तसेच  इतर सुविधा देण्याच्या नावाने इझी बिल गेट वे चा वापर करून देशातील 80 जणांना गंडा घातला. त्यातून त्याने तब्बल पन्नास लाख रुपये हाडपल्याची माहिती समोर आली. या भामटयाला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

शेखर ओमप्रसाद पोद्दार (वय 32 रा जरीपटका नागपूर) असे संशयिताचे नाव आहे. तो आठवी पास असून नागपुरात राहतो. लॉटरी च्या फेक मॅसेज मधून त्याची फसवणूक झाली होती. त्यातून लोकांची फसवणूक करण्याची नामी युक्ती त्याला सुचली. यातून एका मित्राची मदत घेऊन त्याने महा ए सेन्टर नावाने  वेबसाईट तयार केली. लोकांना मॅसज करून सरकारी कामे करून तसेच आधारकार्ड, मतदान कार्ड देण्याची एजंसी देऊ केली. यासाठी त्याने पंधरा हजार रुपये प्रत्येकाकडून इझी बिल गेट वे द्वारे घेऊन फसवणूक केली. औरंगाबादच्या वदोडबाजार येथील रमेश कुलकर्णी यांचीही अशीच फसवणूक झाली. संशयित शेखर पोद्दार याला ग्रामीण सायबर सेलने नागपूरहून अटक केली. -

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह  यांनी माहिती दिली की, शेखर पोद्दार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वेबसाईटद्वारे देशात 80 जणांची फसवणूक केली व आतापर्यंत 50 लाख रुपये हडपले. शेखरविरुद्ध उत्तरप्रदेश, नागपूर व औरंगाबादेत चार गुन्हे नोंद आहेत. त्याने या पूर्वी नागपुरात लोकल एजंसी थाटून फसवणूक केली होती. तसेच देशाच्या अशोक स्तंभाचा बेकायदेशीरपणे वेबसाईटवर वापर केला होता.

Web Title: Aurangabad news fake website cheting