प्रत्‍यक्षात न मिळालेल्या कर्जमाफीची ‘बॅनरबाजी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

औरंगाबाद - कर्जमाफीसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी रान पेटविलेले असताना सरकार आणि भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम सुरू आहे. कर्जमाफीचा ऑक्‍टोबरपर्यंत अभ्यास करण्याचे सरकारने सांगितले, असताना भाजपने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाल्यासारखी शहरात बॅनरबाजी सुरू केली आहे. कर्जमाफीच्या घोषणेचे शिवसेनेस श्रेय मिळू नये म्हणून भाजपकडून जोरकस प्रयत्न होताना दिसत आहेत. 

गावोगावी आंदोलनाचे लोण पोचले आहे. मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊन जाहीर करू, असे सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील होर्डिंगबाजीवर राज्यभर जोरदार टीका होत असतानाही औरंगाबादच्या नेत्यांनीही होर्डिंग लावले आहेत. ‘तत्पर कृती शेतकऱ्यांच्या हितासाठी, सक्षम निर्णय शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी’ हे वाक्‍य असलेली होर्डिंग लावण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभारही मानण्यात आले.

किती कर्जमाफी झाली, कुणाला लाभ मिळाला, शेतकऱ्यांचे कधीपासूनचे कर्जमाफ झाले? राज्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली? त्यांचे सातबारे कोरे झाले का? याचे उत्तर भाजप नेत्यांकडे नसताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होर्डिंग लावले.

Web Title: aurangabad news farmer