औरंगाबादेत माथेफिरूने पेटवल्या दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

निलेश रत्नाकर घुले यांची व अन्य एका व्यक्तीची दुचाकी टाऊन हॉल परिसरात उड्डाणपुलाजवळ होत्या. बुधवारी (ता.13) बारानंतर अज्ञात माथेफिरूने दुचाकींवर इंधन ओतून त्या पेटवल्या.

औरंगाबाद : औरंगाबादेत अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी पेटवल्या. हि घटना टाऊन हॉल परिसरात गुरुवारी (ता. 14) उघड झाली.

निलेश रत्नाकर घुले यांची व अन्य एका व्यक्तीची दुचाकी टाऊन हॉल परिसरात उड्डाणपुलाजवळ होत्या. बुधवारी (ता.13) बारानंतर अज्ञात माथेफिरूने दुचाकींवर इंधन ओतून त्या पेटवल्या. धूर व आग लागल्याने हि बाब उघड झाली.

त्यानंतर नागरिकांनी दुचाकींची आग नियंत्रणात आणली. घटनेनंतर सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम पथकासह घटनास्थळी गेले व त्यांनी पाहणी केली. या प्रकरणी निलेश घुगे यांनी तक्रार दिली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Aurangabad news fire on two wheeler