रेल्वेस्टेशन रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - रेल्वेस्टेशन रस्त्यावर नव्यानेच सुरू झालेल्या एका जुगार अड्ड्यावर रविवारी (ता. 24) रात्री छापा घालून पोलिसांनी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्यासह 50 जणांना अटक केली. एकूण सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

औरंगाबाद - रेल्वेस्टेशन रस्त्यावर नव्यानेच सुरू झालेल्या एका जुगार अड्ड्यावर रविवारी (ता. 24) रात्री छापा घालून पोलिसांनी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्यासह 50 जणांना अटक केली. एकूण सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

वेदांतनगर भागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसीच्या कार्यालयासमोर एका इमारतीत पत्त्यांचा क्‍लब सुरू असल्याची खबर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना मिळाली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाईचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा घातला. यावेळी तीनमजली इमारतीच्या दोन मजल्यांवरून जुगार खेळणाऱ्यांसह 50 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रोकड, टेबल, खुर्च्या, इतर साहित्य असा माल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली. सर्वांना वेदांतनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून, सोमवारी (ता. 25) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

बडे राजकारणी, वकिलांचा समावेश 
छाप्यात पकडलेल्या 50 जणांत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता तथा एमआयएमचा विद्यमान नगरसेवक जहांगीर खान अब्बास खान मुलानी ऊर्फ अज्जू पहिलवान याचाही समावेश आहे. कॉंग्रेसचा माजी नगरसेवक अब्दुल सत्तार अब्दुल रशीद हा क्‍लब चालवत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाड घातली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये राजकारणी, वकील आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: aurangabad news Gambling