आता घाटीतही शक्‍य झाली  कमी वेळेत मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

औरंगाबाद - दीर्घ प्रतीक्षेनंतर 36 लाखांची फेको मशिन शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील नेत्ररोग विभागात दाखल झाली आहे. आता टाक्‍यांशिवाय कमी वेळेत डोळ्यांची सूक्ष्म छेद मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर छोट्या घडीचे भिंग टाकणे सहज शक्‍य होणार असून त्यामुळे रुग्णाला आठवडाभरातच सुटी मिळणार आहे. 

सध्या राज्यातील केवळ तीन शासकीय रुग्णालयांतच ही मशिन उपलब्ध आहे. त्यामध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, पुणे येथील ससून आणि आता घाटी रुग्णालयाचा समावेश झाला आहे. या मशिनचे सोमवारी (ता. 19) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अद्ययावत असलेल्या या आधुनिक पद्धतीच्या मशिनमुळे गरीब रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. शस्त्रक्रिया करताना छोटी जखम होणार असल्याने ती लवकरच भरण्यास मदत होते. 

यावेळी विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांनी या मशिनबद्दल माहिती दिली. डॉ. वैशाली उने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास डॉ. सुधीर चौधरी, डॉ. जैन, डॉ. बिंदू, डॉ. शेंडे, डॉ. डोईफोडे, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अनिल जोशी, डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. सईदा अफरोज, डॉ. अविनाश लांब, डॉ. अर्चना वरे, डॉ. अमरनाथ आवरगावकर, डॉ. वेणुकुमार रंगू, डॉ. तपन जक्‍कल यांच्यासह पदव्युत्तरचे विद्यार्थी उपस्थित होते. 

गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात मोतीबिंदूची फेको मशिनद्वारे शस्त्रक्रिया करून घेणे परवडत नाही. घाटीत ही मशिन दाखल झाल्यामुळे गरीब रुग्णांना चांगला फायदा होईल. दिवसभरात जवळपास 25 शस्त्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. लवकरच ही मशिन कार्यान्वित होईल. 
- डॉ. वर्षा नांदेडकर, नेत्ररोग विभागप्रमुख 

Web Title: aurangabad news ghati hospital

टॅग्स