सरकारी शाळाच सरस! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - गेल्या काही वर्षांत खासगी शाळांचे भरमसाट पेव फुटले असले, तरी "एनसीईआरटी'तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळांची गुणवत्ता खासगी शाळांच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद - गेल्या काही वर्षांत खासगी शाळांचे भरमसाट पेव फुटले असले, तरी "एनसीईआरटी'तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळांची गुणवत्ता खासगी शाळांच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. 

शहर व जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा खासगी शाळांकडे ओढा वाढल्याने इंग्रजी माध्यमासह, सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक नामांकित संस्था सरसावल्या आहेत. तालुकास्तरावर, मोठ्या गावांत अशा शाळा सुरू केल्या जात असताना दुसरीकडे या शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे राहू नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शालेय दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. पहिलीपासून इंग्रजी, ज्ञानरचनावाद यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. आता यावर "एनसीईआरटी'ने शिक्कामोर्तब केले आहे. 

असे केले सर्वेक्षण 
"एनसीईआरटी'तर्फे 2017 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासाठी रॅंडम पद्धतीने शाळांची निवड केली गेली. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका; तसेच खासगी शाळांची गुणवत्ता तपासण्यात आली. तिसरीच्या वर्गासाठी मराठी, गणित व परिसर अभ्यास, पाचवीसाठी मराठी, गणित, परिसर अभ्यास आणि आठवीसाठी मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्रात विद्यार्थी किती निपुण आहेत, याची चाचणी घेण्यात आली. जिल्हा परिषद, महापालिका शाळांच्या गुणवत्तेत खासगी अनुदानित शाळांच्या तुलनेत अधिक गुणवत्ता दिसून आली आहे. 

इयत्ता विषय (गुणवत्ता) सरकारी शाळा खासगी अनुदानित शाळा 
तिसरी मराठी 72 टक्के 70.40 टक्के 
गणित 74.23 टक्के 65.87 टक्के 
परिसर अभ्यास 71.23 टक्के 70.9 टक्के 
पाचवी मराठी 64.06 टक्के 55.62 टक्के 
गणित 60.34 टक्के 50.90 टक्के 
परिसर अभ्यास 60.35 टक्के 53. 76 टक्के 
आठवी मराठी 70.64 टक्के 60.27 टक्के 
गणित 54.88 टक्के 41.27 टक्के 
विज्ञान 47.46 टक्के 40.04 टक्के 
सामाजिकशास्त्रे 55.87 टक्के 43.73 टक्के

Web Title: aurangabad news government school best