शहागंज परिसरात रविवारी हेरिटेज वॉक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीने विविध ऐतिहासिक स्थळे, वास्तू आणि शहराच्या जुन्या भागात आयोजित केला जाणारा हेरिटेज वॉक या वेळी रविवारी शहागंज परिसरात होणार आहे. चमनमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्यापासून सकाळी साडे सातला वॉक सुरू होईल. जुन्या औरंगाबाद शहराचे जाणते इतिहास संशोधक रफत कुरेशी आणि डॉ. दुलारी कुरेशी यांच्यासोबत फिरताना निजाम आसफजहाच्या काळातील शाही मस्जिद, सहावा निजाम मेहबूब अली पाशाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बांधलेला घड्याळीचा मनोरा, सब्जीमंडी आणि चमन परिसराचा इतिहास जिज्ञासूंना जाणून घेता येणार आहे

औरंगाबाद - निजामाचा वजीर मलिक अंबरने वसवलेल्या ऐतिहासिक शहागंज परिसरात रविवारी (ता. 12) हेरिटेज वॉक घेण्यात येणार आहे. येथील शाही मस्जिद, घड्याळीचा मनोरा, सब्जीमंडी आणि चमन परिसराचा इतिहास नागरिकांना जाणून घेता येईल. 

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीने विविध ऐतिहासिक स्थळे, वास्तू आणि शहराच्या जुन्या भागात आयोजित केला जाणारा हेरिटेज वॉक या वेळी रविवारी शहागंज परिसरात होणार आहे. चमनमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्यापासून सकाळी साडे सातला वॉक सुरू होईल. जुन्या औरंगाबाद शहराचे जाणते इतिहास संशोधक रफत कुरेशी आणि डॉ. दुलारी कुरेशी यांच्यासोबत फिरताना निजाम आसफजहाच्या काळातील शाही मस्जिद, सहावा निजाम मेहबूब अली पाशाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बांधलेला घड्याळीचा मनोरा, सब्जीमंडी आणि चमन परिसराचा इतिहास जिज्ञासूंना जाणून घेता येणार आहे.

विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक व इतिहासप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या सचिव डॉ. बिना सेंगर यांनी केले आहे. 

Web Title: aurangabad news: heritage walk