होमिओपॅथिक डॉक्‍टरांसाठी आधुनिक अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

औरंगाबाद - राज्यातील सर्व होमिओपॅथिक इंटिग्रेटेड वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांना आता एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र (फारमेकॉलॉजी) हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

औरंगाबाद - राज्यातील सर्व होमिओपॅथिक इंटिग्रेटेड वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांना आता एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र (फारमेकॉलॉजी) हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता असलेल्या राज्यातील 19 वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करता येतील. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचासुद्धा यात समावेश आहे. बीएचएमएस, डीएचएमएस पदवी घेतलेल्या डॉक्‍टरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनचे (हिम्प) अध्यक्ष डॉ. प्रकाश एम. झांबड केले आहे.

Web Title: aurangabad news homoeopathic doctor modern syllabus