पतीला उसाच्या रसातून दिले विष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

लोहगाव -  नवरा पसंत नसल्याच्या कारणावरून नवविवाहितेने पतीला उसाच्या रसातून विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बिडकीन पोलिसांनी केलेल्या तपासातून उघड झाला आहे. या प्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन पोलिस ठाण्यांर्तगत असलेल्या चितेगाव येथील आकाश नरवडे (वय 23) या तरुणाचा विवाह चौका (ता. फुलंब्री) येथील नेहा सुरेश साठे हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. नेहाला पती पसंत नसल्याने तिने 16 एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास उसाच्या रसातून पतीला विष पाजले होते. त्यानंतर आकाशला उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास फौजदार राणी सानप यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी केलेल्या तपासात पत्नी नेहा हिनेच पती पसंत नसल्याच्या कारणावरून पतीला उसाच्या रसातून विष पाजल्याची कबुली दिली. पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध बुधवार (ता. 16) बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता अल्पवयीन असल्याने महिला व बाल कल्याण विभागाच्या अध्यक्षांसमोर तिला हजर करणार असल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले. पुढील तपास फौजदार राणी सानप, हवालदार अनिल शिंदे करीत आहेत. 

Web Title: aurangabad news husband given poison into the sugarcane juice