औरंगाबादचा ओंकार देशपांडे जेईई ऍडव्हान्समध्ये आठवा

अतुल पाटील
रविवार, 11 जून 2017

औरंगाबाद : 'जेईई ऍडव्हान्स'मध्ये औरंगाबादचा ओंकार देशपांडे हा देशात आठवा आला आहे. ३६६ पैकी ३२७ गुण मिळवत त्याने हे यश मिळवले आहे.

जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (ऍडव्हान्स) चा ऑनलाईन निकाल आज सकाळी दहा वाजता लागला. २१ मे रोजी परीक्षा झाली होती. औरंगाबादच्या ओंकारने जेईई मेन्स् मध्येही ३६० पैकी ३०९ गुण मिळवत देशातून टॉप टेनमध्ये आला होता. सोबतच एमएच - सीईटी मध्येही २०० पैकी १९२ गुण घेत राज्यातून अंतिम दहामध्ये समावेश आहे.
जेईई मेन्स् मधून २.२लाख विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यातून १.७ ला विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

वेळ, काळ यापेक्षा क्लासमध्ये जो टॉपिक शिकवला जायचा, तो घरी आल्यानंतर पक्का करत संपवायचा. आयआयटी पवई किंवा बेंगलोरच्या आय आयएससीमधून पुढील शिक्षण पुर्ण करणार असल्याचे ओंकार ने 'सकाळ'ला सांगितले.

Web Title: aurangabad news IIT JEE adavance omkar deshpande rank