आधी मशिदींवर कारवाई करा,  मगच मंदिरांना हात लावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - अनधिकृत धार्मिक स्थळांची पाडापाडी करताना केवळ मंदिरांवरच कारवाई केली जात असून, आतापर्यंत २५ मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली, आता तेवढ्याच मशिदी पाडा, त्यानंतरच पुढील करवाई करा, अशी मागणी करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या दालनात ठिय्या मांडला. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे, त्यात दर्गा, इतर धार्मिक स्थळांचाही समावेश आहे, असे स्पष्ट करीत आयुक्तांनी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत या वेळी दिले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी चार वाजता आयुक्त श्री. मुगळीकर यांची भेट घेतली. या वेळी श्री. दानवे यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करताना महापालिकेच्या पथकाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. मुख्य रस्त्यांवर क्रांती चौकातील मशीद, सिल्लेखान्यातील शादीखाना, अंगुरीबाग येथील मशिदींचा अडथळा आहे. प्रशासन या ठिकाणी कारवाई का करीत नाही? शहरात विकासकामे होत नाहीत; पण मंदिरे पाडण्याची कारवाई होते, शिवसेना हे खपवून घेणार नाही, आतापर्यंत २५ मंदिरे पाडण्यात आली आहेत. आता तेवढ्याच मशिदी पाडा त्यानंतरच पुढील कारवाई करा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दानवे यांनी दिला. धार्मिक स्थळांची यादीच चुकीची झाली. शिवाय खासगी जागांवर असलेल्या मंदिरांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी पदाधिकारी, नगरसेवकांनी केला. या वेळी उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेते गजानन मनगटे, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, अनिल पोलकर, विजय वाघचौरे, संतोष जेजूरकर, नगरसेवक राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, सीताराम सुरे, सिद्धांत शिरसाट, मकरंद कुलकर्णी, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, मनीषा लोखंडे, आशा भालेराव, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सुमित्रा हाळनोर, सीमा खरात, माजी नगरसेवक सुशील खेडकर, अनिल जैस्वाल, किशोर नागरे यांची उपस्थिती होती. शिष्टमंडळाने तब्बल दीड तास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला होता. 

यादीत चुका झाल्याचे मान्य
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्यासाठी आम्ही टप्पे ठरविले आहेत. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर येणारी, दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या मोकळ्या जागा, हरितपट्ट्यातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यात दर्गा, मशीद व इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे, मुख्य रस्त्यावरील धार्मिकस्थळांचा देखील यादीत समावेश आहे, त्या ठिकाणी करावाई होईल. काही मशिदी वक्‍फ बोर्डाच्या जागेवर असून, कारवाईला बोर्डाने स्थगिती दिली असल्याचे आयुक्तांनी शिष्टमंडळास सांगितले. शिवाय यादीत काही चुका झाल्याचेही त्यांनी मान्य केले.

Web Title: aurangabad news illegal religious place