आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हल २९ ऑक्‍टोबरला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - धम्मयान एज्युकेशनल ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे रविवारी (ता. २९) येथील शहानूरवाडी येथील जबिंदा इस्टेट येथे आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्ष यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती भिक्‍खू एम. धम्मज्योथी थेरो यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली. 

या फेस्टिव्हलसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भदंत खेमधम्मो महाथेरो, भदंत बोधिपालो महाथेरो, भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदंत डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत यशका इरापाडल महाथेरो, भदंत कुसल महाथेरो, भदंत आयुपाल महाथेरो (म्यानमार), भदंत चंदिमा (बांगलादेश), भदंत दीपवस, भदंत कुवेन, भदंत धनकाऊ, भदंत सोमपाक थेरो, भदंत ला मा (थायलंड), भदंत आर्या प्रज्ञा, आर्या किम होग (व्हिएतनाम), भदंत सोमपाक थेरो आदी देश विदेशातील भिक्‍खूगण उपस्थित राहणार आहेत. प्रफुल्ल ढेपे व मनीष बागूल या बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे कार्यवाह आहेत.

Web Title: aurangabad news International Buddhist Festival