जायकवाडी धरण निम्म्याच्या वर भरले; पाण्याचा ओघ वाढला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : जायकवाडी धरणात काल रविवार (ता.20) पासून वरच्या धरणातून पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) दुपारपर्यंत 56.91 टक्‍के इतका पाणीसाठा झाला होता.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारपासून वरच्या धरणातुन पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) सकाळी आठ वाजेपर्यंत 1212.96 फूट म्हणजेच 461.150 मीटर इतकी पाणीपातळी झाली होती.

धरणात 1223.738 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा होता तर 56.36 टक्‍के पाणी साठा झाला होता. दुपारी एक वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 1513 फूट म्हणजेच 461.190 मीटर इतकी पाणीपातळी झाली होती. धरणात 1235.18 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा होता तर 56.91 टक्‍के पाणी साठा झाला होता. दुपारी 1 वाजेपर्यंत 17 हजार 777 क्‍युसेक्‍स वेगाने पाण्याची आवक होती.

Web Title: aurangabad news jaikwadi dam storage

टॅग्स