दरोडे खोर ठार अन् मृतदेह गायब?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

चेदामेंदा झालेला मेंदू रस्त्यावर, पोलिसही चक्रावले, तपास सुरू

अकुंशनगर, (जि. जालना) :  डोणगाव फाट्याजवळ सुंदरम जिनिंग समोर औरंगाबाद-बीड महामार्गावरील वाहने अडवून लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या दरोडेखारोला ट्रक धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (ता. 20) मध्यरात्री घडली आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन एक तलवार मिळली आहे. मात्र, मृतदेह गायब असल्याने सर्वच चक्रावून गेले आहेत. दरम्यान, हा प्रकार नेमका काय आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-बीड राष्ट्रायी महामार्गावर रात्री काही अज्ञात व्यक्ती वाहन लुटण्याच्या इराद्याने गाड्या आडवित होते. याच दरम्यान या दरोडेखोरांनी एक ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबविता दरोडेखोरांच्या अंगावर घतला. यात एक अज्ञात दरोडेखोर मयत झाला असल्याची शंका आहे. कारण घटनास्थळावर पोलिसांना मानव जातीचा मेंदू अढळून आला आहे. मात्र, मृतदेह घटास्थळावरुन गायब आहे. तसेच एक टाबी आणि तलवार ही अढळून आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकास ही प्राचारण केले होते. मात्र त्याचा ही काही फयदा झाला नाही. दरम्यान, या अपघातामध्ये इतर जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकांकडून मिळाली असून, जखमीचा शोध घेण्यासाठी गोंदी पोलिसांची एक टीम औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांकडून जखमीसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Web Title: aurangabad news looters killed body disappeared