शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भात पंकजा मुंडे सचिवांशी चर्चा करणार

सुषेन जाधव
शनिवार, 10 जून 2017

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली निर्णयाला राज्यभरातून शिक्षकांचा विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने आज (शनिवार) औरंगाबादेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

औरंगाबाद - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली निर्णयाला राज्यभरातून शिक्षकांचा विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने आज (शनिवार) औरंगाबादेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने यंदाच्या जिल्हांतर्गत बदल्या रद्द करण्याची मागणी केली त्यावर मुंडे यांनी या संदर्भात सोमवारी सचिवांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले. शाळांच्या सुरुवातीला शिक्षण विभागाला विद्यार्थी प्रवेशोत्सव, गणवेश, शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके वाटप अशी कामे महत्त्वाची असतात. त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक या बदली धोरणामुळे त्रस्त असल्याची कैफियत समितीने मांडली. यावर मुंडे सचिवांशी सविस्तर करणार असल्याचे समितीचे राज्य सरचिटणीस उदय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news marathi news teachers news transfer news