तीन अपघातात १४ जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या तीन अपघातांत १४ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले. त्यात बीड जिल्ह्यात पुणे-बीड मार्गावर धानोरानजीक मुंबईहून लातूरकडे येणारी खासगी बस उलटून नऊ प्रवासी जागीच ठार झाले, तर दुसऱ्या अपघातात बीड जिल्ह्यातच गेवराई तालुक्‍यात बोअरवेल्सचा ट्रक उलटून दोन जण मृत्युमुखी पडले. तिसरा अपघात हैदराबादजवळ जीपचा झाला. यात औसा (जि. लातूर) येथील तीन जण ठार झाले. 

बीड येथील सागर ट्रॅव्हल्सची बस शनिवारी रात्री मुंबईहून लातूरकडे निघाली होती. धानोरा गावाजवळ पहाटे चार-साडेचारच्या सुमारास घाटवळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस खड्ड्यात कोसळली. चार ते पाच कोलांट्या खात ही बस रस्त्यापासून सुमारे दोनशे फुटांवर उभी राहिली. या अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २६ जण गंभीर जखमी झाले. मृतांची नावे ः रशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (वय ६०, रा. बाराबाई गल्ली, अंबाजोगाई), अतिक खान मुनवर पटेल (वय ३२, खोतीजवळा, जि. बीड), मेहरुन्निसा अतिक खान पटेल (वय ३५), असिमा नजीम सय्यद (वय ४५, दोघे रा. सिराज हाऊस, सोनापूर, भांडूप- पश्‍चिम), सर्जेराव लक्ष्मण पवार (वय ३०, रा. वाडीवाटा तांडा, जि. बीड), योगेश गौतम टकले (३०, रा. चिखली, जि. बीड), बहादूर इस्माईल पठाण (वय ६५, रा. जि. लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर ( वय ४५, रा. कर्वेनगर, पुणे), चाँदपाशा पठाण (वय ५५, रा. नेकनूर, जि. बीड). तसेच दुसऱ्या अपघातात गेवराई (जि. बीड) येथून ठाकर आडगाव येथे बोअरकामासाठी जात असताना बोअरवेल्सचा ट्रक उलटल्याने त्याखाली चिरडून दोन कामगार जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तालुक्‍यातील जातेगाव रस्त्यावरील सोनवाडी फाट्याजवळ आज सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला.

औसा तालुक्‍यातील तिघे अपघातात ठार
हैदराबाद येथे धार्मिक कार्यक्रमास गेलेल्या औसा तालुक्‍यातील जीपला झहिराबादजवळ अपघात होऊन जीपमधील तीन जण जागीच ठार, तर अन्य सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मृतांमध्ये भादा (ता. औसा) येथील दाम्पत्याचा समावेश आहे.

Web Title: aurangabad news marathwada accident

टॅग्स