मराठा आरक्षणासाठी 26 रोजी जनसुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे लातूर येथे येत्या 26 रोजी आणि उस्मानाबाद येथे 27 रोजी मराठा आरक्षणासाठी जिल्हा स्तरावरील खुली जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. लातूर व उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळात ही जनसुनावणी होईल.

या जनसुनावणीमध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींकडून आरक्षणाबाबत सादर करावयाची निवेदने, पुरावे, तथ्ये, माहिती, प्रतिपादन, दस्तऐवज आदी माहिती लिखित स्वरूपातच स्वीकारण्यात येईल, असे आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news marathwada news maratha reservation result