साडेअठरा हजार विद्यार्थ्यांची पदव्युत्तर सीईटीला उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रांवर सोमवारी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) झाली.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रांवर सोमवारी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) झाली.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ११ हजार ६०० जागा आहेत. विद्यापीठ कॅंपसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅंपसमधील पाच विषयांसाठी, तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांत ५१ पदव्युत्तर महाविद्यालयांत ७० विषयासाठी सीईटी झाली. नोंदणी केलेल्या १९ हजार २१ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. औरंगाबादच्या २७ केंद्रांतून १० हजार ५७३, जालनातील आठ केंद्रावर २ हजार ६७४, बीडमध्ये नऊ केंद्रावर ३ हजार ३७४, उस्मानाबादमध्ये सात केंद्रांवर दोन हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. औरंगाबाद ३७०, जालना १४, बीड २५६, उस्मानाबाद ६७ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.

अशी असेल प्रक्रिया
सीईटीचा निकाल १५ जुलैला लागणार आहे. नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे, तसेच कागदपत्रांच्या तपासणीसाठी १५ ते २५ जुलै मुदत आहे. सर्वसाधारण यादी ३० जुलै, प्रथम यादी एक ऑगस्ट, द्वितीय यादी सात ऑगस्ट, स्पॉट ॲडमिशन दहा ऑगस्टला होणार आहेत. प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविण्यासाठी ११ ते १४ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: aurangabad news marathwada university education