वैद्यकीय प्रवेशाचे काउंडाऊन सुरू 

योगेश पायघन
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - वैद्यकीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा "नीट'मध्ये देशातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची राज्यातील चार केंद्रांवर शनिवारी (ता. 15) पडताळणी सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पडताळणीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकात क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांनी डायरेक्‍ट चॉईस ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती औरंगाबाद कागदपत्र पडताळणी समितीचे केंद्रप्रमुख डॉ. सिराज बेग यांनी दिली. 

औरंगाबाद - वैद्यकीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा "नीट'मध्ये देशातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची राज्यातील चार केंद्रांवर शनिवारी (ता. 15) पडताळणी सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पडताळणीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकात क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांनी डायरेक्‍ट चॉईस ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती औरंगाबाद कागदपत्र पडताळणी समितीचे केंद्रप्रमुख डॉ. सिराज बेग यांनी दिली. 

आरोग्य विज्ञान पदवीपूर्व प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या केंद्र स्तरावर झालेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत  (एनईईटी-यूजी 2017) उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया तितकीच किचकट आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून त्याचे पालन केले तर ती सोपी होऊ शकते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) शनिवारी सुरू झालेली कागदपत्रांची तपासणी शुक्रवारपर्यंत (ता. 21) चालेल. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत घाटी प्रशासनातील साठजण ही छाननी करीत आहेत. केंद्र अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र निरीक्षक डॉ. अजित दामले, डॉ. आर. एस. बिंदू, डॉ. मोहन डोईबोले, डॉ. के. यू. झिने, डॉ. अनिल जोशी यांच्यासह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व कर्मचारी मेहनत घेत आहेत. 

वेळापत्रकात क्रमांक नाही? 
ऑल इंडिया रॅंकिंग वेळापत्रकात समावेश नाही, अशा विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आता पुढे काय, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यासाठी डीएमआरईच्या संकेतस्थळावर डायरेक्‍ट चॉईसचा ऑनलाइन फॉर्म यूजर नेम आणि पासवर्ड वापरून भरायचा आहे. त्यासंबंधीचे www.dmer.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेले माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला केंद्रप्रमुख डॉ. बेग यांनी दिला आहे. 

माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा 
ऑनलाइन प्राधान्यक्रम अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण सूचना या माहितीपत्रकात आहे. कागदपत्रांची छाननी, निवड आणि प्रवेशप्रक्रियेत उमेदवाराने स्वतः उपस्थित राहावे. मूळ कागदपत्रे आणि माहिती भरल्याप्रमाणे झेरॉक्‍सचा एक संच सोबत आणावा. समुपदेशनावेळी पालकांपैकी एकाला उमेदवारांसह थांबण्याची परवानगी दिली जाईल. पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर न केल्यास प्राधान्य अर्ज किंवा कोणत्याही प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. 

या अभ्यासक्रमांना घेता येईल प्रवेश 
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, बीपी अँड ओ आणि बीएएसएलपी, सर्व विनाअनुदानित खासगी महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान संस्थांचे अभ्यासक्रम. 

वेळापत्रक 
तारीख - एआयआर - सत्र 
सोमवार (ता. 17) 54001 ते 65000 सकाळी 9.00 
65001 ते 75000 दुपारी 2.00 
----- 
मंगळवार (ता. 18) 75001 ते 85000 सकाळी 9.00 
85001 ते 95000 दुपारी 2.00 
----- 
बुधवार (ता. 19) 95001 ते 105000 सकाळी 9.00 
105001 ते 115000 दुपारी 2.00 
----- 
गुरुवार (ता. 20) 115001 ते 125000 सकाळी 9.00 
125001 ते 135000 दुपारी 2.00 
----- 
शुक्रवार (ता. 21) 135001 ते 300000 सकाळी 9.00 (फक्त एस.टी. प्रवर्ग) 
135001 ते 300000 दुपारी 2.00 (विदर्भ - संरक्षण, अपंग, मराठवाडा - संरक्षण) 

Web Title: aurangabad news medical entrance