जिल्ह्यात दूध संकलनातचाळीस टक्‍क्‍यांनी घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांचा संपाचा दूध संकलनाला फटका बसला असून, जिल्हा दूध उत्पादन संघाच्या संकलनात सोमवारी (ता.5) कमालीची घट झाली. सकाळच्या सत्रात दररोज पंचावन्न हजार लिटर दूध संकलित केले जात होते; मात्र सोमवारी केवळ सदतीस हजार लिटर दूध जमा झाले.

औरंगाबाद - शेतकऱ्यांचा संपाचा दूध संकलनाला फटका बसला असून, जिल्हा दूध उत्पादन संघाच्या संकलनात सोमवारी (ता.5) कमालीची घट झाली. सकाळच्या सत्रात दररोज पंचावन्न हजार लिटर दूध संकलित केले जात होते; मात्र सोमवारी केवळ सदतीस हजार लिटर दूध जमा झाले.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे दूध संकलनात तब्बल चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने सकाळ-संध्याकाळच्या सत्रात जिल्हाभरात दुधाचे संकलन करण्यात येते. सकाळच्या सत्रात सरासरी 55 हजार लिटर दूध संकलित होते; मात्र बंदमुळे शेतकऱ्यांनी संकलन केंद्रांकडे पाठ फिरविली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात 37 हजार लिटर दूध संकलन झाले. कोल्ड स्टोरेजमध्ये असलेल्या दुधाच्या साठ्यातून तूट भरून काढत मंगळवारची गरज भागवली जाण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्याबाहेर जाणारे दूध बंद
वैजापुरात शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याने येथे एक थेंब दुधाचेही संकलन झाले नाही, अशी माहिती अधिकारी डी. पी. बोर्डे यांनी दिली. जिल्ह्यातून बाहेर जाणारे सुमारे 30 ते 32 हजार लिटर दूधही संप सुरू झाल्यापासून गेले नसल्याचे ते म्हणाले.

एक जूनपासून उतार-चढाव
एक जूनपासून शेतकऱ्यांचा संप सुरू असून, संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दूध विक्रीसाठी आणले नाही. 88 ते 90 हजार लिटर दुधाचे संकलन करणाऱ्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संकलनाच्या आलेखात मोठा उतार-चढाव पाहायला मिळाला. एक जूनलाचा संकलनाचा आकडा 60 हजारांवर आला. दोन जूनला अधिक घसरण होत हा आकडा 52 हजारांवर आला. दोन दिवसांपूर्वी संप मागे घेतल्याची घोषणा होताच हा आकडा 71 हजार लिटरवर गेला. रविवारी (ता. 4) संकलन पूर्ववत झाल्याने आकडा 88 हजारांवर पोचला होता.

Web Title: aurangabad news milk collection 40% decrease