ओवैसी काय बोलतात याकडे पोलिसांचे लक्ष

मनोज साखरे
सोमवार, 22 जानेवारी 2018

प्रक्षोभक भाषण केल्यास होणार कारवाई

औरंगाबाद, : "एमआयएम'चे सर्वेसर्वा व खासदार असदोद्दीन ओवैसी यांची औरंगाबादेत आमखास येथे सभा होणार आहे. कोरगाव भीमा आणि शरीयत कायदा यावर ते बोलणार असले तरी ते काय बोलतात याकडे पोलिसांचे लक्ष ठेवणार आहेत. प्रक्षोभक भाषण केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते, असे पोलिस आयूक्तांनी आज (सोमवार) स्पष्ट केले.

खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्या सभेला औरंगाबादेत परवानगी मिळाली असून, सायंकाळी सहा वाजता आमखास मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला परवानगी देताना त्यावर पोलिस दलाकडून अटी व शर्थी लावण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिस आयूक्त म्हणाले की, ओवैसींच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. सभास्थळी कॅमेरे व ड्रोनची टेहळणी राहील. भाषणासंबंधी त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. पण परवानगीच्या पत्रातच प्रक्षोभक भाषण न करण्याबाबत त्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे आयूक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news mim asaduddin owaisi speech and police