ट्रिपल तलाकच्या नावाने शरियत मध्ये हस्तक्षेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

औरंगाबादेत मुस्लिम महिलांचा महामोर्चा

औरंगाबाद: मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियत मध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा यासाठी शुक्रवार (ता. 23) रोजी दुपारी तीन वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मुस्लिम महिला मोर्चा कृती समिती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शरियतमधील हस्तक्षेप हा सहन करण्यासारखा नाही. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचारण करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. मुस्लिम समाजात तलाकचे प्रमाण अतिशय कमी असतांना फक्त राजकीय फायद्यासाठी काही महिलांना पुढे करुन ट्रिपल तलाकचा कायदा करण्यात आला. मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या आहे. विधवा, निराधार महिलांकडे कुणी ही लक्ष देत नाही. तलाक न देताच कित्येक महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे त्यांचा प्रश्‍न सुद्धा गंभीर आहे. सच्चर समितीने मुस्लिम महिलांसाठी अनेक शिफारशी केल्या आहे त्या सरकार का लागु करत नाही. दारुमुळे अनेक महिलांचे कुटुंब उद्धवस्त झाले मात्र दारुबंदी केली जात नाही. समाजातील मुळ समस्यांकडे लक्ष न देता फक्त राजकीय फायद्यांच्या अनावश्‍यक मुद्यांकडे लक्ष दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ट्रिपल तलाकच्या कायदा मागे घ्यावा यासाठी शुक्रवारी काढल्या जाणाऱ्या मोर्चाची तयारी पुर्ण झाली असून यासाठी विविध ठिकाणी कॉर्नर मिटींग घेण्यात आल्याची माहिती मोर्चाच्या समन्वयक फहीमुन्निसा बेगम, शाकेरा खानम, शाहीस्ता कादरी, शबाना आईमी, कमर सुलताना, समीना बानो, मुबशिरा फिरदौस, कादरी माहरुख, फोतमा फिरदोस यांनी दिली.

Web Title: aurangabad news muslim women triple talaq