शहरात कॅरिबॅगचा बिनधास्त वापर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

औरंगाबाद - प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. बंदी असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवरील कारवाई गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे व्यापारी, हातगाडीचालक बिनधास्तपणे कॅरिबॅगचा वापर करीत असून, प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहे. 

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बंदी असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवर व विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती. अशा कॅरिबॅग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता; मात्र पुढे श्री. केंद्रेकर यांची बदली झाल्यानंतर कॅरिबॅगला पुन्हा मोकळे रान मिळाले. गेल्या काही महिन्यांत कॅरिबॅग जप्तीची एकही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, पालकमंत्री रामदास कदम यांनी पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणादेखील त्यांनी औरंगाबाद येथून केली. त्यानंतर खडबडून जागे झालेले महापालिका अधिकारी गेल्या काही दिवसांपासून कॅरिबॅगच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे मात्र कोणत्याही व्यापारी हातगाड्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा वापर बिनधास्तपणे सुरू आहे.

विशेष पथक बंद
कॅरिबॅग जप्ती करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष पथक तयार केले होते. या पथकाने शहरात सहा टन कॅरिबॅग जप्त केल्या होत्या. सुमारे आठ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला होता; मात्र सध्या हे पथक बंद करण्यात आले असून, कारवाईची जबाबदारी प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आली आहे. 

आदेशाची फाईल आयुक्तांकडे अडकली 
कॅरिबॅगवर कारवाई करण्यापूर्वी महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते; मात्र यासंबंधीची फाईलच आयुक्तांकडे अडकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: aurangabad news plastic carry bags