पोलंड वारी स्वखर्चानेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - इलेक्‍ट्रिक बस आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या पाहणीसाठी पोलंडला जाणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना दौऱ्याचा खर्च स्वतः करावा लागेल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. दहा) स्पष्ट केले. 

औरंगाबाद - इलेक्‍ट्रिक बस आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या पाहणीसाठी पोलंडला जाणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना दौऱ्याचा खर्च स्वतः करावा लागेल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. दहा) स्पष्ट केले. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहर बस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. असे असतानाच पोलंड येथील एका कंपनीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. नऊ) अधिकारी-पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या वेळी अधिकारी, पदाधिकाऱ्यांना घनकचरा प्रकल्प व शहर बसची पाहणी करण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. लवकरच शिष्टमंडळ पोलंडचा दौरा करणार आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, की पोलंड दौऱ्याला जाणाऱ्या शिष्टमंडळाला खर्च महापालिकेच्या तिजोरीतून दिला जाणार नाही. त्यांनी हा दौरा स्वखर्चातून करावा, असे श्री. घोडेले म्हणाले. 

इलेक्‍ट्रिक बसची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारेच करण्याचे निश्‍चित झाले आहे. मंगळवारी या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत केवळ चर्चा झाली. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणीबाबत लवकरच निर्णय घेऊ. त्याआधी अमरावती येथील प्रकल्पाची पाहणी केली जाणार आहे.
- डी. एम. मुगळीकर, आयुक्‍त

Web Title: aurangabad news poland tour self expenditure