नियमभंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

औरंगाबाद - शहराची वाहतूक सुकर करण्यासाठी पोलिस विभाग सरसावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. 21) वाहतूक पोलिसांनी जळगाव रस्ता व गजानन महाराज मंदिर परिसरात मोहीम राबवली. यात सुमारे 70 वाहनचालकांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली. 

औरंगाबाद - शहराची वाहतूक सुकर करण्यासाठी पोलिस विभाग सरसावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. 21) वाहतूक पोलिसांनी जळगाव रस्ता व गजानन महाराज मंदिर परिसरात मोहीम राबवली. यात सुमारे 70 वाहनचालकांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली. 

शहराची वाहतूक समस्या जटिल बनली आहे. या समस्यांवर उपाय करून शहरातील वाहनधारकांना मोकळा श्‍वास घेता यावा, यासाठी मोठी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेची सुरवात झाली असून पोलिस उपायुक्त दीपाली धाडे-घाडगे तसेच सहायक वाहतूक आयुक्त सी. डी. शेवगण पथकासह रस्त्यावर उतरले. सकाळी दहा ते साडेबारादरम्यान ही कारवाई झाली. प्रामुख्याने गजानन महाराज मंदिर परिसर व जळगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यात नो पार्किंगमध्ये असलेली वाहने, रिक्षातील ओव्हरसीट तसेच वाहतूक नियमांचा भंग करणारी वाहने लक्ष्य करण्यात आली. 

चारचाकी वाहनांना हायड्रॉलिक क्रेनच्या साह्याने उचलून नेण्यात आले, तर काहींवर जॅमर लावण्यात आले. हायड्रॉलिक क्रेनमुळे वाहनांना उचलताना नुकसान होत नाही, अशा दोन क्रेन शहर पोलिसांकडे असून आणखी चार क्रेन मागवण्यात आल्या आहेत. या क्रेन आल्यानंतर चारचाकी वाहनांवरील कारवाईला गती मिळेल, असा विश्‍वास उपायुक्त धाडे-घाडगे यांनी व्यक्त केला. 

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे यावर आमचा भर आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई करून वाहनचालक, दुचाकीस्वारांना शिस्त लावणे यावर आम्ही काम करीत आहोत. 
- दीपाली धाडे-घाडगे, पोलिस उपायुक्त 

Web Title: aurangabad news police traffic

टॅग्स