खड्डे बुजविण्याच्या खर्चाला लागली कात्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे यंदा हाती घेण्यात आलेल्या बाय ऍन्युअल मेंटेनन्स पद्धतीमुळे खड्डे बुजविण्याच्या खर्चाला कात्री लावता आली आहे. 50 कोटींच्या घरात जाणारे खड्डे बुजविण्याचे काम यंदा 22 कोटींमध्ये केल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. 

सार्वजनिक बांधकाम विभागाला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडतात. हे खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी निविदा काढण्याची पद्धत बंद झाल्याने त्यासाठीचा खर्च निम्म्यावर आला आहे. बाय ऍन्युअल पद्धतीने हे कंत्राट देण्यात येत असून, या निविदा भरणाऱ्यांवर त्या खड्ड्यांची जबाबदारी निश्‍चित केली गेली असल्याने कामाचा दर्जा सुधारत असल्याचा दावा अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केला आहे. जो कंत्राटदार निविदा घेईल, त्यावर तो खड्डा दोन वर्षे उखडू नये याची जबाबदारी असल्याने तो ते काम अधिक व्यवस्थित आणि दर्जा राखून करीत असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. यापूर्वी या कामासाठी 50 कोटींपेक्षा कमी खर्च होत नसे, पण आता हा खर्च 22 कोटींपर्यंत खाली आला असल्याचे ते म्हणाले.

Web Title: aurangabad news potholes issue