'प्रिया'वर चित्रीत झालेल्या 'त्या' गाण्यावर आक्षेप!

मनोज साखरे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

औरंगाबादेतील जिन्सी पोलिस ठाण्यात दोन तक्रारी दाखल

औरंगाबाद: आपल्या अदाकारीने अनेकांना घायाळ करणारी व रातोरात स्टार झालेली नटी प्रिया प्रकाश वॉरीयर हिच्यावर चित्रीत "ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातील गाण्यावर जनजागरण समिती, एमआयएमच्या पदाधिकाऱ्याकडून आक्षेप घेण्यात आला. धार्मिक भावना दूखावल्याची तक्रार त्यांनी जिन्सी ठाण्यात दाखल करुन संबंधित व्यक्तींवर गून्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

"ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातील गाण्यावर चित्रीत सीन सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर चित्रपटासह प्रिया प्रकाश वॉरीयर प्रसिद्धीच्या झोतात आली. परंतू, दूसरीकडे नव्या वादाला तोंड फूटले आहे. जनजागरण समितीने चित्रपटातील गाण्याबाबत आक्षेप नोंदवून जिन्सी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चित्रपटातील गीताबद्दल आक्षेप असून मूस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दूखावल्या गेल्या. या गीतावर कायमची बंदी करावी तसेच टीव्ही चॅनेलवर हे गीत दाखवण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. सोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक, उमर लुलु, व नायिका प्रिया प्रकाश वॉरीयर, निर्माता, गीतकार, संगीतकार आदींविरुद्ध तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, आबीदा बेगम, नूमान अहेमद यांच्यातर्फे ही तक्रार देण्यात आली. एमआयएमचे बायजीपूरा येथील वार्ड अध्यक्ष शोएब सय्यद यांनीही जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात चित्रपटात गाण्याबाबत आक्षेप नोंदवून मूस्लीम समाजाच्या भावना दूखावल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: aurangabad news priya warrior song muslim crime