अतिक्रमण सिद्ध करून दाखवाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - एमआयएमच्या पाच नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेला ठराव माझा एकट्याचा नाही, तो सभागृहाने केलेल्या मागणीनुसार बहुमताने घेतलेला निर्णय आहे. आमदार इम्तियाज जलील यांनी माझे अतिक्रमण सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. दहा) दिले. 

दमडीमहल येथील अतिक्रमणाच्या कारवाईत हस्तक्षेप करून महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या एमआयएम पक्षाच्या पाच नगरसेवकांची पदे रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव शनिवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यावरून महापालिकेत राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी (ता. नऊ) विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन ही सर्वसाधारण सभा रद्द ठरविण्याची मागणी केली होती. महापौर नंदकुमार घोडेले व स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनीच घरासाठी अतिक्रमण केले आहे, त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, असेदेखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यावर श्री. घोडेले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून विधी विभागाच्या सल्ल्याने व सभागृहात नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार बहुमताने घेतला आहे. कठोर निर्णय असल्यामुळे कोणालाही वाईट वाटणे स्वाभाविक आहे. या निर्णयाविरोधात ते कुठेही जाऊन दाद मागू शकतात. माझे अतिक्रमण असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे.

पाणी माझ्या घरी नेले का? 
एका वसाहतीला पाणी देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याच्या आरोपावर महापौरांनी ‘पाणी माझ्या घरी नेले का?’ असा प्रश्‍न करीत शहरातील सर्वच नागरिकांना पाणी देण्याचे महापालिकेचे धोरण असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news Prove the encroachment