एटीएमचे 74 लाख लांबविणारा औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात

Crime
Crime

औरंगाबाद - पिंपरी-चिंचवड येथे विविध बॅंकांत भरण्यात येणारी 74 लाख पन्नास हजारांची रक्कम पळवून नेणाऱ्या चौथ्या संशयिताला औरंगाबाद पोलिसांनी रविवारी (ता. 4) ताब्यात घेतले आहे. येथील युवराज हॉटेलमध्ये तो वास्तव्य करीत होता. त्याला आज पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रणजित धनंजय कोरेकर (रा. खाजानगर, उस्मानाबाद) असे संशयिताचे नाव आहे.

ब्रिक्‍स इंटरनॅशनल कंपनीमार्फत पिंपरी-चिंचवड भागात विविध बॅंकांच्या एटीएममध्ये रक्कम जमा करण्यात येते. एटीएममध्ये 31 जानेवारीला रक्कम भरल्यानंतर ऍक्‍सिस बॅंकेत रक्कम भरतेवेळी 74 लाख पन्नास हजार रुपयांसह कोरेकर हा वाहन घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. कोरेकरला एका प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर 74 लाख पन्नास हजार रुपये पळवल्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी दिली. पोलिसांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर कोरेकर याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

अशी पटवली ओळख
एक तरुण चोरीचा मोबाईल विकत असल्याची बाब पोलिस उपनिरीक्षक सिद्दीकी यांना मिळाली होती. त्यानंतर सिद्दीकी यांच्या पथकाने कोरेकरला पकडले. तो पिंपरी-चिंचवडच्या चोरी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे लक्षात येताच सिद्दीकी यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, त्याची ओळख पटवण्यात अडचणी आल्याने पोलिसांनी कोरेकरचा फोटो व्हॉट्‌सऍपवर वाकड पोलिसांना पाठवला. तेव्हा औरंगाबाद पोलिसांनी पकडलेला संशयित तोच असल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com