शहरात पाऊस पुन्हा सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - पाऊस पुन्हा औरंगाबादेत सक्रिय झाला असून शहराला वरुणराजाने रविवारी (ता. २७) जोरदार झोडपून काढले. शहरात सायंकाळनंतर जोरदार वृष्टी झाली. चिकलठाणा वेधशाळेत ४६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद - पाऊस पुन्हा औरंगाबादेत सक्रिय झाला असून शहराला वरुणराजाने रविवारी (ता. २७) जोरदार झोडपून काढले. शहरात सायंकाळनंतर जोरदार वृष्टी झाली. चिकलठाणा वेधशाळेत ४६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सुमारे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या पावसाने शहराला रविवारी चिंब केले. हा पाऊस शहरात आता किमान आगामी दोन दिवस मुक्कामी राहण्याची शक्‍यता आहे. ४८ तास सक्रिय राहिल्यानंतर पावसाला उतार पडेल आणि किमान दोन दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर १ सप्टेंबरदरम्यान शहरावर पाऊस पुन्हा सक्रिय होऊन दोन दिवस वृष्टी होण्याचा अंदाज हवामानशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली.

Web Title: aurangabad news rain

टॅग्स