जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

औरंगाबाद - जिल्ह्यातील काही भागांत रविवारी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला, तर शिवना (ता. सिल्लोड) परिसरात सायंकाळी पाचनंतर पाऊणतास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेल्या मका, गहू, हरभरा व सोयाबीन यासारख्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात वाळविण्यासाठी पसरवून ठेवलेला मका व पथाऱ्यांवर वाळवण्यासाठी पसरविलेली लाल मिरची भिजल्याने व्यापाऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाऊस संपेपर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता. पैठण तालुक्‍यातील चितेगाव, लोहगाव हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. गंगापूर तालुक्‍यातील डोणगाव परिसरात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले, गंगापूर शहरातही पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. कन्नड तालुक्‍यातील चापानेरलाही पाऊस झाला. 

Web Title: aurangabad news rain marathwada