शहरात पावसाचा शिडकावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शहरावर ढगांचा डेरा होता. तीन दिवस ढगांचा मुक्काम राहिल्यानंतर सोमवारी (ता. 19) सायंकाळी आणि रात्री उशिरा पावसाचा शिडकावा झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला आहे. कडक उन्हाचा अनुभव येण्याऐवजी शहरावर ढगांचा डेरा गेल्या तीन ते चार दिवसांपासून आहे. हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवली जात असतानाच शहरात सोमवारी (ता. 19) सायंकाळी आणि रात्री उशिरा बेमोसमी पावसाचा शिडकावा शहरभर झाला. 

Web Title: aurangabad news rain marathwada