परतीचा पाऊस मार्गस्थ...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद: नवरात्रोत्सवाच्या पहिल्या - दुसऱ्या दिवसापासून पाऊस अनेक ठिकाणांहून गायब झाला आहे. अर्थात पावसाने परतीचे मार्ग धरल्याची चिन्हे स्पष्ट÷झाल्याचे एमजीएमच्या खगोलशास्त्र व अंतराळ केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

दरवर्षी राज्यात 7 जूनला मॉन्सूनचे आगमन होऊन आणि पाच ते दहा ऑक्‍टोबरला परतीचा पाऊस मार्गस्थ होतो; मात्र यंदा 10 जूनला मॉन्सूनचे आगमन झाले आणि 21 ते 22 सप्टेंबरला परतीला लागल्याने "उशिरा आला, अन्‌ लवकर गेला' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यभरात अद्यापपर्यंत दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहिला होता, मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर भागातून पाऊस गायब होण्याची चिन्हे आहेत, असेही श्री. औंधकर म्हणाले.

थंडीचे लवकर आगमन
मराठवाड्यातील तापमानात सध्या घट होत आहे. मागील आठवडाभरातील आकडेवारी पाहता 20 अंश सेल्सिअंशपर्यंत तापमान गेले होते. जसेजसे तापमान कमी होईल तसे थंडीचे दिवस जवळ येतात. दरवर्षी ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणारी थंडी मराठवाड्यातील काही ठिकाणी मागच्या आठवडाभरापासून जाणवत आहे. यात 10 ऑक्‍टोबरपर्यंत आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेलेले दिसत आहे. त्यामुळे थंडीचे लवकर आगमन होत आहे, असेही श्री. औंधकर म्हणाले.

Web Title: aurangabad news rain return