रक्त सांडले तरी बेहत्तर, इंचभरही जमीन देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

समृद्धी महामार्ग विरोधी परिषदेत शेतकऱ्यांचा निर्धार 
 

औरंगाबाद : मागणी नसताना आणि नागपुरहुन मुंबईकडे जाण्यासाठी अगोदरच तीन मार्ग शिल्लक असताना नव्या महामार्गांची निर्मिती कशासाठी करायची. पैसा पुरत नाही आणि जमिन सरत नाही त्यामुळे रक्त सांडले तरी बेहत्तर पण समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.12) औरंगाबादेत केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्ग शेतकरी विरोधी परिषदेत दहा जिल्ह्यांमधुन आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ठाणे, नगर, औरंगाबाद, जालना, वर्धा, नागपुर, अमरावती आदी ठिकाणांहुन आलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीन तास भाषणातुन मनोगते व्यक्त केली.

नागपूर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी तीन महामार्ग सध्या अस्तित्वात आहेत. यातील रसत्यांच्या चौपदरीकरणाला मंजुरी असताना त्याचे काम रखडले. असे असताना नव्या मार्गांसाठी कोणतीही मागणी नाही. समृद्धी प्रकल्पाच्या विरोधात रक्त सांडले तरी बेहत्तर पण इंचभरही जमीन देणार नसल्याचा निर्धार या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या परिषदेत केला.

Web Title: aurangabad news samruddhi mahamarg farmers strike agitation