‘समृद्धी’साठी कंपन्यांची नियुक्ती होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद - समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कंपन्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांकडून पाच पॅकेजमधील कामांच्या आधारावर प्रस्ताव मागविले आहेत. 

औरंगाबाद - समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कंपन्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांकडून पाच पॅकेजमधील कामांच्या आधारावर प्रस्ताव मागविले आहेत. 

७०१ किलोमीटर लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या रस्त्याची पाच पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली असून, या पॅकेजेसमधील बारकावे आणि निविदा प्रक्रियेच्या नियम व अटी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपन्यांना गेल्या पाच वर्षांचा अहवाल आणि आपल्या आर्थिक क्षमता सिद्ध कराव्या लागणार आहेत. या प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी इच्छुक कंपन्यांकडून त्यांच्या वाट्याला आलेल्या कामासाठीचा अपेक्षित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा अवधी तपासण्यात येणार आहे. कंपन्यांना आपला प्रस्ताव सादर करताना दुरुस्तीचा एकूण कालावधी सांगावा लागणार आहे. एकूण सहापदरी असलेल्या या रस्त्यावर विमानांसाठी तीन आपत्कालीन धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपानी कंपन्यांकडून यापूर्वी विचारणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया आता सुमारे महिनाभर चालणार असून, २१ फेब्रुवारीला कंपन्यांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यांच्यातील सर्वांत कमी बोली लावणाऱ्या कंपनीच्या हाती या प्रकल्पाचे काम दिले जाणार असल्याचे एमएसआरडीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

दृष्टिक्षेपात समृद्धी महामार्ग 
 महामार्ग लांबी - ७०१.०५ किमी 
 वाहनांचा वेग ः १५० किमी प्रति तास
 पदर ः ६ (३+३), बोगदा ः १ 
 विश्रामतळ ः प्रत्येकी ५० किमीवर 
 आपत्कालीन धावपट्ट्या ः ३ 
 ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, सोलर लायटिंग
(औरंगाबाद-जालना सेक्‍शन)
 अंडरपास ः ४४, रेल्वे उड्डाणपूल ः १ 
 मोठे पूल ः ४, लहान पूल ः ६१

Web Title: aurangabad news samrudhi highway