अनंतनाग येथील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता. ११) गुलमंडीवर निदर्शने करण्यात आली. दहशतवादी व पाकिस्तानविरोधी घोषणांनी गुलमंडी परिसर दणाणून गेला. या वेळी दशहतवाद्यांच्या पुतळ्याला जोडे मारून हल्ल्याचा निषेध करण्यात आला; तसेच या हल्ल्यातील मृत भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर सोमवारी (ता. १०) रात्री दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेचा मुद्दा संसदेत उचलणार आहे. हल्ला करणाऱ्यांना गोळीनेच उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी निषेध व्यक्त केला. उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजूरकर, बंडू ओक, नंदकुमार घोडोले, राजू राठोड, राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, कृष्णा पाटील डोणगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, कला ओझा, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, तालुकाप्रमुख बाप्पा दळवी, गोपाळ कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, आत्माराम पवार, नितीन साळवी, सुभाष शेजवळ आदी सहभागी झाले होते.

मनसेतर्फे काळ्या फिती लावून निषेध
मनसेतर्फे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. क्रांती चौक येथे मृत भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी बिपिन नाईक, संदीप कुलकर्णी, ॲड. निनाद खोचे, लीला राजपूत, सपना ढगे, अनिता लोमटे, किरण जोगदंडे, मनीष जोगदंडे, निखिल ताकवाले, शेखर रणखांब, किशोर पांडे, रवी काळे, सय्यद फेरोज, विशाल भालेराव, आकाश गोंडे, अमोल थेठे, अंकुश काळे, गणेश गायकवाड, दीपक पवार, चंदू नवपुते आदी उपस्थित होते.

Web Title: aurangabad news shiv sena MNS anantnag attack Protest demonstrations