स्मार्ट सिटीचे कारभारी आता दिल्लीच्या मोहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद - दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद शहराला स्मार्ट करू पाहणारे कारभारी आता दिल्लीच्या प्रेमात पडले आहेत. आमखास मैदानालगत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर शहराचा उल्लेख ‘सिटी ऑफ गेट्‌स’ करताना त्यावर चक्क दिल्लीतील इंडिया गेटचे चित्र छापले आहे. 

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या ‘स्मार्ट सिटी’ बोधचिन्हात गेटवे ऑफ इंडिया आणि ताज महाल छापल्यानंतर आता कारभाऱ्यांना दिल्लीचा मोह झाला आहे. आमखास मैदानालगत असलेल्या स्मार्ट सिटी वॉररूम बाहेर लावण्यात आलेल्या फलकावर शहराचा ‘सिटी ऑफ गेट’ असा उल्लेख केला; पण त्याच्यासह चक्क दिल्लीच्या इंडिया गेटचे फोटो छापत शहराबाबत असलेली आपली अनास्था सिद्ध केली आहे. शहरातील प्रमुख आकर्षण असलेल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांची छायाचित्रे या फलकावर छापण्यात आली आहेत. त्यात अतिक्रमणांनी ग्रासलेलेल्या सलीम अली सरोवराचे बंद कारंजे दाखविण्यात आले आहेत.  

स्पर्धेत मागवलेले बोधचिन्हे गेली कुठे? 
स्मार्ट सिटीचे बोधचिन्ह कसे असावे, यासाठी औरंगाबाद महापालिकेने वर्ष २०१६ च्या शेवटी एक स्पर्धा घेत नागरिकांकडून बोधचिन्हांचे डिझाइन मागविले होते. या स्पर्धेसाठी हजारो रुपये महापालिकेने खर्च केले होते. या स्पर्धेत कोणाचे बोधचिन्ह आले, त्यांची संख्या किती, त्यातून कोणाचे डिझाइन निवडले गेले, हे प्रश्‍न मात्र स्पर्धेच्या दीड वर्षांनंतर अनुत्तरित आहेत. या झालेल्या खर्चातून नेमके महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या काम पाहणाऱ्या संस्थेने काय साधले हे विचारण्यासाठी सिकंदर अली यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: aurangabad news smart city