स्मार्ट सिटीच्या निधीतून डस्टबिन खरेदी करणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. यासाठीचा डीपीआर मंजूर झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीतून डस्टबिन खरेदी करण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. 

शहरातील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची याच प्रकरणात बदली झाल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम काम पाहत आहेत. कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जागेची पाहणी करण्याबरोबरच कचऱ्याचे "ओला आणि सुका' असे वर्गीकरण करून घेणे, शिवाय कचऱ्याचे डंपिंग न करता त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान, महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या निधीतून दहा हजार डस्टबिन खरेदीचा घाट घातला जात आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, की शहराच्या कचरा प्रश्नासाठी डीपीआर मंजूर झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा निधी डस्टबिनसाठी वापरणे चुकीचे ठरणार आहे. 

Web Title: aurangabad news smart city dustbin AMC