मोकाट कुत्र्यांच्या रस्तोरस्ती टोळ्या!  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

औरंगाबाद - उकिरड्यांवर राहणाऱ्या कुत्र्यांना शहरातील कचराकोंडीमुळे भलतेच ‘बळ’ आले आहे. साचलेल्या कचऱ्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारून हे कुत्रे दहशत पसरवत आहेत. 

वाहनचालक आला, की कुत्रे टोळीने वेगाने त्याच्यावर हल्ला करतात. पादचाऱ्यांवरही त्यांच्यापासून लपून छपून मार्ग काढण्याची वेळ आली आहे.

शहरात साचलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही. सध्या दाट नागरी वस्त्यांमध्ये कुंड्यांमधून बाहेर येत अक्राळ विक्राळ पसरलेल्या कचऱ्यावर कुत्र्यांचे अधिराज्य आहे. या कचऱ्यात खरकटे, मांस, हाडे आदींचा समावेश असल्याने या कुत्र्यांची सध्या चंगळ सरू आहे. दिवसा उकिरड्यावर बसणारे कुत्र्यांचे टोळके सांज होताच आक्रमक रूप धारण करीत आहेत. दुचाकीस्वारांच्या अंगावर हे कुत्रे घोळक्‍याने धावून जात असल्याने वाहनचालक चांगलेच धास्तावले आहेत. पादचाऱ्यांना अगोदरच कचऱ्याच्या दुर्गंधीने मार्गक्रमण करणे अवघड झाले आसताना त्यात कुत्र्यांची दहशत आता छळणारी ठरत आहे. 

मांसाचे तुकडे गल्ल्यांमध्ये 
उकिरड्यावर येणाऱ्या कुत्र्यांचे तेथे असलेल्या कुत्र्यांशी भांडण होते. यात ते अनेकदा रस्त्यावर येऊन वाहनचालकांचा जीव धोक्‍यात घालतात. ज्यांना उकिरड्यावर खाता येत नाही, ते हळूच पडलेल्या मांसाच्या तुकड्यावर आणि खरकट्यावर ताव मारण्यासाठी तेथून पळ काढतात. त्यामुळे लोकांच्या घरांसमोर आणि गल्ल्यांमध्ये उकिरड्यावर सडलेल्या मांसाचे तुकडे पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

येथून जाताना सावधान!
रोशनगेट, सेंट्रलनाका, बायजीपुरा, जिन्सी, बूढीलेन, सिटीचौक, भाजीमंडई, सिल्लेखाना, टाऊन हॉल, पुंडलिकनगर रोड, मुकुंदवाडी परिसर, जयभवानीनगर आदी परिसरांतून जाताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: aurangabad news street dog

टॅग्स