नियंत्रण सुटलेला ट्रक धडकला पुलाला; दोन जखमी

मनोज साखरे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

असे काढले बाहेर
स्टेरिंग घुसेल्याने चालक आतच अडकला होता. पोटाचा काही भाग कापून त्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर चालकालाा घाटी रुग्णालयात दाखल केले.

औरंगाबाद : डोळा लागल्याने चालकाचे ट्रेकवरील नियंत्रण सुटून ट्रक पुलाला धडकला. यात चालकाच्या पोटात तर लगत बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात काच घुसून ते जखमी झाले. ही गंभीर घटना औरंगाबादेतील बाळापुर शिवार, बीडबायपास येथे रविवारी ता, 4, पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.

अनिल हरी हराडे (वय 20, रा. उमरगा) असे जखमी चालकाचे नाव आहे, दुसऱ्याचे नाव कळू शकले नाही. पोलिसांनी माहिती दिली की, एक ट्रॅक पुणे येथुन उस्मानाबादकडे निघाल्यानंतर पहाटे औरंगाबादेत पोचला. चालकाने विश्रांती घेणे आवश्यक असतानाही त्याने आपला प्रवास सुरूच ठेवला.

डोळा लागल्यानंतर मात्र ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले व  बाळापूर शिवारातील रस्त्याच्या एका पुलाला ट्रक धडकला. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅकचे स्टेरिंग चालकाच्या पोटात घुसला तर लगत बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात काच घुसली. केबिनमध्ये झोपल्याने क्लिनरला मात्र कोणतीही जखम झाली नाही. 

असे काढले बाहेर
स्टेरिंग घुसेल्याने चालक आतच अडकला होता. पोटाचा काही भाग कापून त्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर चालकालाा घाटी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Aurangabad news truck accident 2 injured