औरंगाबादेत पहिल्या राज्यस्तरीय ऊर्दू शिक्षणाच्या वारीला सुरवात

सुषेन जाधव
शनिवार, 10 मार्च 2018

औरंगाबाद: शालेय शिक्षण, क्रीडा विभागातर्फे औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकूल येथे पहिल्या राज्यस्तरीय तीन दिवसीय ऊर्दू शिक्षणाच्या वारीचे आज (शनिवार) उद्‌घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्काइपवरुन उपस्थितांशी संवाद साधत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

संवाद साधताना श्री. तावडे यांनी ऊर्दू भाषेच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, राज्य समन्वयक पिराजी पाटील, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, सहाय्यक शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुभाष कांबळे, गजानन सुसर, मंत्रालयीन समन्वयक अंकुश बोबडे यांची उपस्थिती होती.

आणि मिळाली मान्यता...
श्री. तावडे यांच्याशी स्काइपद्वारे संवाद साधताना धामणगाव (ता. फुलंब्री) येथील शिक्षिका शेख सादिया अल्ताफ यांनी गावात ऊर्दू शाळेत केवळ आठवीपर्यंतच वर्ग आहे, पुढचा वर्ग नसल्याने पाल्यांचे शिक्षण थांबते. परिणामी त्यांना लग्नासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यामुळे दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्याची मागणी केली. यावर तावडे यांनी येत्या पंधराच दिवसात दहावीपर्यंत वर्गाला मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही दिली.

काय आहे वारीत
वारीमध्ये विविध विषय, घटक, संकल्पनावर काम करणाऱ्या संस्था, शाळा, व्यक्तींचे 50 स्टॉल आहेत. यात एकूण 176 नवोपक्रमी, उपक्रमशील शिक्षक आपल्या शिक्षणविषयक साहित्य, नवोपक्रम पद्धतीचे सादरीकरण करणार आहेत.

Web Title: aurangabad news urdu education wari vinod tawde